
दैनिक चालू वार्ता हदगांव प्रतिनिधी :- सचिन मुगटकर
तालुक्यातील पांगरी (ता )येथील मारहाणी घटना घडलेल्या संदर्भात तामसा पोलीस स्टेशन येथे लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गेले असता व मागील झालेल्या घटनेची विचार पूस केली असता येथील कार्यरत असलेले. तामसा पोलीस स्टेशनचे अधिकारी मुंजाजी दळवी यांनी काही न विचारता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत हातापायी करत दोन तास पोलीस स्टेशन येथे दाबून ठेऊन आपल्या पदाचा गैरवापर करत मारहाण करण्याची धमकी देऊन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली त्यामुळे संबंधित ठाण्याचे अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 20/12/2022 रोजी उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग भोकर येथे उपोषण करण्यात येईल असे तक्रारी निवेदन लहुजी शक्ती सेना यांचे वतीने उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग भोकर येथे दिनांक 13/12/2022 रोजी दिले यावेळी संतोष वाघमारे, शिवाजी वाघमारे, प्रकाश वाघमारे, सचिन मुगटकर,राजू गायकवाड, के. डी. पवार, चंद्रकांत वाघमारे, किशनमामा कांबळे,किरण खानजोडे, बालाजी शेळके संतोष सुरोसे,सोनू काळे चंद्रकांत वाघमारे,प्रकाश वाघमारे, आदी कार्यकर्ते निवेदन देतांना मोठया संख्येने उपस्थित होते