
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे शहर – संभाजी पुरीगोसावी.
राज्यात मंगळवारी उशिरा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या. यामध्ये पुणे शहर चे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्था अप्पर पोलीस महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यांत आली. तर त्यांच्या रिक्त जागेवर रितेशकुमार यांची नियुक्ती करण्यांत आली. त्यांनी मावळते आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला. डॅशिंग आयपीएस अधिकारी रितेशकुमार हे शिस्तप्रिय अतिशय शांतपणे काम करणारे १९९१ तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई शहर पोलीस दलात विविध पदावर काम पाहिले तर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पोलीस हे नागरिकांचे मित्र असून लोकाभिमुख पोलीसिंग राबवण्यांवर भर दिला जाईल . तसेच शहरांतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मेहनत घेणार असल्यांचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले तसेच पुणेकरांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यांचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले… मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडूंन शुक्रवारी सायंकाळी रितेशकुमार यांनी पुणे शहर आयुक्त पदाचा पदभार घेतला. यावेळी सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण रामनाथ पोकळे यांच्यासह सर्व परिमंडळाचे विभागांचे पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. नूतन आयुक्तांनी पदभार घेताच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत मांडले.