
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील विसावा कॉर्नर येथे श्री साईबाबांच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. पाथरी येथील श्री साईबाबांच्या दिव्य पादुका घेऊन ही पालखी आज परभणीत आली आहे.
श्री साई भक्त मंडळ परभणी आयोजित पाथरी येथील श्री साईबाबांच्या दिव्य पादुका आणि पालखी मिरवणूक १५ ते २० डिसेंबर या कालावधीत परभणीत सर्वत्र आयोजित केली जाणार आहे.
त्याच अनुषंगाने आज गुरुवार, दि. १५ डिसेंबर रोजी दिव्य पादुका व पालखी मिरवणूक परभणी शहरात दाखल झाली आहे. त्या निमित्ताने आज विसावा कॉर्नर येथे या भव्य पालखी मिरवणूकीचे रामभाऊ रेंगे आणि भाविक भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करुन दर्शनाचा लाभ घेतला आहे.
या सहा दिवसांच्या कालावधीत ही भव्य अशी पालखी मिरवणूक शहराच्या विविध भागात जाणार आहे. या पालखी सोबत भजनी मंडळ, वारकरी सांप्रदायाचे भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याशिवाय मंडळाचे अध्यक्ष अनुपराव नागेंद्र आण्णा, सचिव सुरेश चव्हाण, देशपांडे, ठाकुर ताई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.