
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :-पेठवडज येथे अवैध धंद्यावर केसेस करणे कामे पि.एस.आय. श्री.इंद्राळे साहेब ,पेठवडज बिटचे जमादार श्री.व्यवहारे साहेब, संतोष काळे साहेब यांनी पेठवडज येथे जाऊन अवैध धंद्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमध्ये ग्रामपंचायत कार्यालय समोरील पानपट्टी मध्ये एक इसम मटका नावाचा जुगार खेळवित व खेळत असते वेळी आढळून आला.त्यांच्याकडून नगदी १६०० रूपये व मटका जुगार खेळाचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री.व्यवहारे साहेब (पेठवडज बिट जमादार)करीत आहेत.पेठवडज व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी पि.एस.आय.श्री.इंद्राळे साहेब व त्यांच्या टिमचे कारवाई केल्याबद्दल आभार मानले आहेत.काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मटका जुगार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.त्यांच्या मागणीला यश आले असून अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.