
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नादी लागून या देशाने घेतला भारतासोबत मोठा पंगा; पाकिस्तानचे नाव घेत थेट…
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासोबतच टॅरिफबद्दल घेतलेल्या धक्कादायक निर्णयानंतर भारत-अमेरिकेतील संबंध अधिकच ताणले आहेत. त्यामध्येच मागील काही दिवसांपासून भारताचे कॅनडासोबतचे संबंधही तणावात आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक केले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प त्यांचे आवडते अध्यक्ष असल्याचेही त्यांनी म्हटले. भारताला धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोट्या दाव्याला मार्क कार्नी यांनी खरे असल्याचे म्हटले. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धाबंदीवरही त्यांनी मोठे विधान केले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काैतुकांचा वर्षाव करताना दिसले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केले काैतुक
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना बोलताना म्हटले की, तुम्ही एक परिवर्तनकारी राष्ट्रपती आहात. अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणे आहे. नाटो भागीदारांना संरक्षण खर्चासाठी वचनबद्ध केले आणि भारत आणि पाकिस्तानपासून अझरबैजान आणि आर्मेनियापर्यंत शांतता प्रस्थापित केली. दहशतवादाची शक्ती म्हणून इराणवर अनेक प्रतिबद्ध लादले. यामुळे तुमचे काैतुक करण्याइतके कमी असल्याचे त्यांनी म्हटले.
भारत-पाकिस्तान युद्धाबाबत केला दावा
मार्क कार्नी यांनी भारत-पाकिस्तान युद्धाचा देखील यावेळी उल्लेख केला. ज्याने त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनीच भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचे थेट म्हटले. भारताने याअगोदर 100 वेळा स्पष्ट म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान युद्धात व्दिपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यानंतर युद्धबंदीचा निर्णय झाला. अमेरिकाच नाही तर दुसऱ्या कोणत्यााही देशांनी यामध्ये हस्तक्षेप घेतला नाहीये. मात्र, डोनाल्ड ट्रम्प सतत हे युद्ध रोखल्याचा दावा करताना दिसत आहेत.
भारत-अमेरिकेतील संबंधात अधिक तणाव
कॅनडा आणि भारताचे संबंध गेल्या काही वर्षांपासून चांगले राहिले आहेत. मात्र, आता कॅनडासोबतचे संबंध तणावात आहेत. त्यामध्येच आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केला. H-1B व्हिसाच्या नियमात अमेरिकेने बदल केल्यानंतर कॅनडाने भारतीय नागरिकांचे कॅनडात आम्ही स्वागत करू आणि चांगले नोकरदार यांना आमच्या देशात संधी देऊ असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.