
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी लातूर :संभाजी पुरीगोसावी
महाराष्ट्रांत सध्या ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे गावागावात प्रचार सभांची चांगलीच लगबग पाहायला मिळत आहे. पत्नीचा सरपंच पदाचा प्रचार करीत असताना एक दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यांतील मुरुड गावात घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या त्यांच्या प्रचारार्थ मुरुड शहरातील सार्वजनिक चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांचे पती अमर पुडलिक नाडे (वय ४५) यांचे स्टेजवरच आकस्मित निधंन झाले. या घटनेमुळे सभेत धावपळ सुरू झाली. पॅनलचे प्रमुख म्हणून अमर नाडे यांनी भाषण केले व ते व्यासपीठावरील पत्नी अमृता नाडे यांच्या शेजारील खुर्चीत विराजमान झाले. त्यानंतर थोड्यांच वेळात अमर नाडे यांनी मान टाकली. आणि अमर नाडे यांनी अवघ्या काही जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीच्या मृत्यूने अमृता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुरुड गावात शोककळा पसरली. अमरनाथ यांच्या पश्चांत पत्नी एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार होता. दुर्दैवी घटनेची माहिती पुरी-गोसावी यांना समजताच त्यांनी मुरुड पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून दुर्दैवी घटनेबाबत माहिती घेतली._*