
दैनिक चालू वार्ता हातकणंगले- कवि सरकार इंगळी
इंगळी येतील मांतग वसाहतींमध्ये रहाणारे शेतमूजूर बबन गायकवाड हे चार दिवसापूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.ते एक उत्तम हलगी वादक होते.
तसेच त्यांच्या शेजारी राहाणारे बाबूराव सिताराम मोरे हे आज सकाळी अचानक ह्यविकार च्या झटक्याने निधन पावले.ते सुद्धा गावतील प्रसिद्द हालगी वादक होते.
गावात कोणताही सावर्जनिक कार्यक्रम असला कि यांना वाजत्रीचे निमंत्रण दिले जात होते.कुणाचे नवीन घराचे तोरण बांधणे,पिराचे देवस्थानला गलिफ घालणे वेळी वाजापसाठी,यात्राच्या वेळी पालखी मोहोर हलगी वाजवण्यासाठी,लग्नकार्याला,घुगळ काढणे,निवडणूक प्रचार असो,मिरवणूक असो.अशा सर्वचं ठिकाणी हे कलाकार हलगी वादकाचे कार्य करते होते.ते दोन हलगी वादक कलाकार काळाच्या पडद्याआड गेलेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.