
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड तालुक्यातील सेवादास विद्यालय वसंतनगर येथे इयत्ता सहावी वर्गाच्या शाळेतील सेवादास विद्यालय वसंतनगर(को)ता.मुखेड येथे इयत्ता सहावी वर्गाच्या वतिने शेषराव वडजे सरांच्या मार्गदर्शनाखाली बालसभेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली…या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शिवराज दिनकर तर प्रमुख वक्ते म्हणुन गोरबा तेलंगे,कृष्णा धनवडे,कु.माहीन शेख,कु.अक्षरा किनवाड,करण बकवाड,या विद्यार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.प्रेमला स्वामी मॅडम,पर्यवेक्षक सुभाष राठोड सर,संस्कृतिक विभाग प्रमुख भारत जायभाये सर ,शादुल सय्यद सर,लक्ष्मण तेलंगे सर,यांच्या हास्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देवुन अभिनंदन करण्यात आले याकार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुणम तेलंगे यांनी केले तर आभार गोरोबा तेलंगे यांनी मानले या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते…