
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
**************************
परभणी/पूर्णा : तालुक्यातील खडाळा, लासीना, भाटेगाव आदी परिसरातील ९ स्टोन क्रेशर्स सील करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. ते सर्व क्रेशर्स अनाधिकृतरित्या चालवले जात असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. त्यामुळे पूर्णा व परभणी परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
सदरची कारवाई ही उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार नितीशकुमार बोरेलू यांनी केली आहे. त्यामध्ये लासीना येथे दोन, खडाळा येथील तीन, कानखेड येथील एक, भाटेगाव येथील एक, आडगाव-सुगाव येथील एक, पूर्णा येथील एक असे एकूण नऊ क्रेशर्स आहेत.
सदरची कारवाई चंद्रकांत वाघ, शिवाजी कराड, बालाजी लटपटे, अभिजित पाटील, दीपक तुपसमुद्रे, राम रासवे, श्री अरविंद आणि वैजनाथ अमदरे आदीजण या पथकात सामील होते. एकूणच या कारवाईमुळे तालुका व जिल्हा स्तरावर सर्वत्र खळबळ उडाली जाणे स्वाभाविक आहे.