
मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा !
मराठा आरक्षणाबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलाय. मराठा आरक्षणाचा जीआर हा फक्त मराठवाड्यापुरताच असल्याचं भाजप मंत्री म्हणालेत. त्यामुळे राज्यातील इतर मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही नका, प्रश्न मराठा बांधवांना पडलाय. नागपुरात झालेल्या ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलंय.
नागपुरातील ओबीसी मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा नियोजितपणे दिशाभूल करण्यात आली. दोन सप्टेंबरचा जीआर फक्त मराठवाड्या पुरता मर्यादित आहे. हा जीआर मराठवाड्याबाहेरचा नाहीये. बैठक झाली तेव्हा वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला. या जीआरचा कुणाची दुरूपयोग करणार नाही. जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही
ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं वचन शिष्टमंडळाला दिलंय. त्यांना अजून खुलासे हवे असतील, स्पष्टीकरण हवं असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत. आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजच हित आमच सरकार जाऊ देणार नाही. हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे. केवळ मराठवाड्यापुत मर्यादित, राज्यात कुठेही हा जीआर लागू नाही. ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवली पाहिजे, असं बावनकुळे म्हणालेत.
उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं, वडेट्टीवार त्यावेळी मंत्रालयात होते. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून दिलं. सत्तेत असताना काही करायचं नाही, आणि सत्ता गेल्यावर कांगावा करायचा, असं म्हणत बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.