
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडे आलेल्या निधीपैकी राज्य सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी रुपये २० हजार कोटींचा निधी वर्ग करण्यात यावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
मराठवाडा जन विकास प्रबोधन परिषदेचे सहसंयोजक जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना याविषयीची माहिती दिली. आज सदर संस्थेच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. सदर परिषदेमध्ये केंद्राकडून राज्य सरकारकडे जो निधी आला आहे, त्या निधी पैकी मराठवाड्याचा हिस्सा म्हणून रुपये वीस हजार कोटींचा निधी वर्ग केला जावा, जेणेकरुन मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी मदतच होऊ शकेल. असा धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत जो मंजूर करण्यात आला आहे, तो अत्यंत उत्कृष्ट असाच म्हणावा लागेल.
राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मराठवाड्याच्या समस्या अवगत व्हाव्यात त्याचबरोबर केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडे दिलेला निधी मराठवाड्यासाठी देणे तथा तो वर्ग करणे हे का व किती गरजेचे आहे, हे अवगत होण्यासाठी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना देऊन ते आपल्या पर्यंत पोहोचते केले जावे आणि आमच्या विधायक मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार केला जावा ही नम्र विनंती केली गेली आहे.