
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून सर्वत्र विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मान्यता दिलेली मतमोजणीची जी जी ठिकाणे आहेत, ती खालीलप्रमाणे नमूद असून ते खडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान थेट जनतेतून निवडणूक घेण्यात आलेले सरपंच आणि जनतेचे सेवक म्हणून ज्या उमेदवारांचे भविष्य उजळले जाणार आहे, ते चित्र दुपारपर्यंतच स्पष्ट होणार आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांची सुध्दा प्रतिष्ठा पणाला लागली जाणार आहे.
सकाळी ठिक १० वाजता मतमोजणीला जेथे जेथे सुरुवात केली जाणार आहे त्यात परभणी – कल्याण मंडपम, जायकवाडी वसाहत, परभणी, जिंतूर-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा रोड, जिंतूर, सेलू-तहसील कार्यालय, सेलू, मानवत-बैठक हॉल, तहसील कार्यालय, मानवत, पाथरी-मतदान यंत्र सुरक्षा कक्ष, पाद्री तहसील, पाथरी, सोनपेठ-बैठक हॉल, तहसील कार्यालय, सोनपेठ, पूर्णा-महसूल हॉल, तहसील कार्यालय, पूर्णा, पालम-बैठक हॉल, तहसील कार्यालय, पूर्णा, गंगाखेड-बैठक हॉल, तहसील कार्यालय, गंगाखेड आदी ठिकाणांचा समावेश आहे. सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यासाठी खडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.