
दैनिक चालू वार्ता प्रतीनिधी- किरण धारासुरकर
गंगाखेड तालुक्यातील मौजे धारासुर येथे प्राचीन ऐतिहासिक राज्यसंरक्षित आसलेले गुप्तेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी धारासुर येथील ग्रामस्थानी. गंगाखेड विधानसभाचे विकास रत्न कार्यसम्राटआमदार
श्री रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचे कडे 17 डिसेंबर रोजी निवेदन द्वारे मागणी केली आहे
धारासुर येथील ग्रामस्थांनी यापूर्वी ही
माननीय आमदार रत्नाकर रावजी गुट्टे साहेब आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी . जिल्हा प्रशासन व राज्य शासन तसेच सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नांदेड.औरंगाबाद .
मा.संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व सांस्कृतिक विभागाचे आवर सचिव तसेच उपसचिव यांचेकडे ही वेळोवेळी भेट घेऊन मागणी केलेली आहे गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांनी दखल घेऊन. गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. पुरातत्व विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून. जीर्णोद्धार करा अशी मगील झालेल्या मार्च 2022 च्या अधिवेशन मध्ये. एल ये क्यू दाखल करून लक्षवेधी तारांकित प्रश्न मांडुन राज्य शासनाच्या निदर्शनात आणून दिलेले आहे.
पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे उपसचिव यांचे पत्रानुसार पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक नांदेड. व संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 36 मुद्दे अहवाल ही दाखल केलेला आहे जिल्हाधिकारी परभणी तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरास भेट देऊन संचालक.पुरातत्त्व विभाग व मा.ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. यांना गुप्तेश्वर मंदिराचा अति तातडीने जीर्णोद्धार करण्यासाठीचे
आयुक्त कार्यालय औरंगाबाद कडून पत्रही केलेली आहे.
मा. ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी. 17 सप्टेंबर 2022 रोजी. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहणानंतर. विशेष गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार व विकास निधी विषयी मंजुरी विषयीची घोषणा ही.केलेली आहे.
गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्रस्ताव. हाय पावर उच्चस्तरीय समितीकडे दाखल आहे. उच्चस्तरीय समिती ची निवड झालेली आहे. सदरील प्रस्ताव मंत्रिमंडळाचे कॅबिनेटमध्ये. मंजूर होण्यासाठीचे माहिती मिळाली आहे तरीही.
शासन स्तरावर. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये.गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्रस्तावास प्रशासकीय मान्यता आजपर्यंत मिळालेली नाही. मुख्यमंत्री उपक्रम मुख्यमंत्री किंवा.सांस्कृतिक इतर विभागा कडून गुप्तेश्वर मंदिर शासन निर्णय जीआर निघालेला नाही म्हणून आता. संतप्त झालेल्या धारासुर ग्रामस्थांनी
17 डिसेंबर 2022 रोजी. गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार. यांना निवेदन देऊन नागपूर येथे
चालू असलेल्या अधिवेशनात प्रश्न मांडून पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई येथे दाखल केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून घेऊन गुप्तेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करा अशी विनंती धारासुर येथील ग्रामस्थ 2021 रोजी आमरण उपोषण करते निवृत्ती कदम . दगडूदादा जाधव दिगंबर जाधव प्रल्हाद कदम जयराम कदम ज्ञानेश्वर कदम सर. विक्रम कदम कृष्णा कदम
संजय गं कदम बालासाहेब नेमाने लक्ष्मण कदम भरत जाधव भगवान राठोड काशिनाथ जोगी. सखाराम रणबावरे. लक्ष्मण शिंदे शेषाद्री मोरे नारायण गवळी प्रकाश मस्के शेख हमीद बंटी लोखंडे आदी धारासुर ग्रमस्थांनी 17 डिसेंबर रोजी विधानसभा गंगाखेड आमदार गुट्टे यांना निवेदनाद्वारे पुनश्च विनंती केली आहे .पुरातत्व पर्यटन व सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई येथे दाखल केलेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळून घेण्यासाठी व निधी उपलब्ध करून घेऊन गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी. 19 डिसेंबर 2022 रोजी चालू झालेल्या अधिवेशन मध्ये प्रश्न मांडून प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करून गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार करावा असे निवेदन गंगाखेड विधानसभा लोकप्रिय आमदार मा.श्री.रत्नाकररावजी गुट्टे साहब यांच्याकडे विनंती केली आहे