
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरु करण्यात आली. दरम्यान परभणी शहरातील कल्याण मंडपम येथे मतमोजणीला सुरवात होऊन निकाल लागताच प्रतिस्पर्धी गटांमध्ये तुफान दगडफेक झाली तर पूर्णा शहरात पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करुन बळाचा वापर करावा लागला.
परभणी तालुक्यांतर्गत दमईवाडी येथील मतमोजणी संपली त्यावेळी विजयी गटाचा जल्लोष बघून पराजित गटाकडून त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात चारजण गंभीर जखमी झाले. कर्तव्यावरील तैनात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसऱ्या एका घटनेत पूर्णा येथील मतमोजणी केंद्रावर कानडखेड व निळा या गावांचा निकाल लागताच तेथे एकच जयघोष झाला. एका टोळक्याने विहीत हद्द ओलांडून तेथे घोषणा देवून वातावरण बिघडून टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन त्यांच्यावर बळाचा वापर त्या टोळक्याला तेथून घालवले. ह्या दोन अनुचित घटना वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही काहीही न घडता नियोजित मतमोजणी शांततेत पार पडली गेली. विजयी मिरवणूकाही गुलालाची उधळण करीत जल्लोषात परन्तु नियंत्रणात आयोजित केल्या गेल्या. बहुतांश ठिकाणी सत्तेत परिवर्तन झाल्याचे समजते तर काही ठिकाणी उमेदवार व पॅनेल बदली करुन सत्ता मिळविली गेल्याचे बोलले जात आहे.
परभणी जिल्ह्यातील कारेगाव आणि पिंपरी देशमुख येथील सत्तेत मोठ्या प्रमाणात उलथा पालत झाल्याचे चित्र पुढे आले आहे. कारेगावात परभणी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष दिलीप आवचार यांच्या पॅनेलवर मात करून एके काळचे माजी सरपंच आप्पाराव वावरे गटाचे संपूर्ण म्हणजेच बाराच्या बारा उमेदवार विजयी झाले आहेत. पिंपरी देशमुख येथेही साधारण: तसेच चित्र पुढे आल्याचे समजते. तेथे सुध्दा नागेश बालासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नवीन पॅनेलने विजयाची मात करत जुन्या पॅनेलचा धुव्वा उडविला असल्याचे सांगितले जाते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या निवडणुका झाल्या असल्या तरी त्या चुरशीच्या ठरल्या गेल्याचे दिसून आले.