
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर– तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील धसवाडी ग्रामपंचायत मधील सरपंच पदाच्या उमेदवार धसवादी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता मिरगे यांच्या मातोश्री श्रीमती, सुमनबाई मिरगे यांचा सरपंच पदासाठी दणदणीत विजय झाला आहे तसेच उपसरपंच म्हणून लक्ष्मण घोडके यांची निवड झाली संबंधित जनतेला अभिवादन तथा विनम्र पूर्वक आभार प्रकट करताना दत्ता मिरगे यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी तब्बल ५०१ मतांनी विजय झाला आहे .दत्ता मिरगे यांनी असे सांगितले की माझ्या विजयला व्यर्थ जाऊ देणार नाही माझ्या गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे . मतदानात जे जनतेला आव्हान केले आहे ते सर्वपूर्ण करणार आहे माझ्या गावातील माझ्या विरोधातील पण कार्यकर्ते यांची मी विकासात विचार करणार आहे माझी निवडणूक ही वैचारिक मुघ्यावर होती निवडणूक संपली ते मुद्दे मी माझ्या कार्य किर्दीत पूर्ण करणार आहे माजी सरपंच प्रेमचंद दुर्गे यांनी मला गावाच्या विकासाचा विचार करून पाठींबा दिला आहे. त्याचा आभारी आहे .त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावाच्या विकासात भर घालणार आहे मी पुन्हा एकदा माझ्या गावातील सदस्य तथा मतदारांचे खूप खूप आभार मानतो माझ्या सत्कारासाठी उपस्थित असलेले सर्व गावकऱ्यांचे पण आभार मानतो