
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार व लोहा तालुक्यातील शेतीला विष्णूपुरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी कंधार -लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.काही राजकीय पुढारी जाणून बुजून दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी न सोडण्याची चाल खेळत आहेत.डिंसेबर महीना संपत आला तरी अजून पाणी सोडण्यात आले नाही.अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत तरी कंधार -लोहा तालुक्याचे आमदार श्री.श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा राजकीय पुढारी आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन समस्त कंधार -लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे.नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले आहे पण कंधार -लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यत पाणी सोडण्यात आले नाही.या अगोदर शेतीला ७०% पाणी सोडण्यात येत होते परंतु काही राजकीय पुढार्यांनी ३०% पाणी शेतीसाठी देण्याचे जूलमी नियम काढले आहेत.हरभरा, गहू, ज्वारी सोन्यासारखे पिके करपून जात आहेत त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.