
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील पाथरूड येथे फिनीक्स इंग्लिश स्कूल शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.या मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने खूप छान ,छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते.स्टॉलची मांडणी विविध पदार्थाची विक्री ,खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. मान्यवरांचा हस्ते बाल आनंद मिळवायचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा ताण तणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.यावेळी मुख्याध्यापक बापू खांडेकर,शिक्षकवृंद स्वप्नाली टाळके, वैशाली टाळके , सोनाली खुणे, पुनम दोडके,प्रवीण साखरे सत्यभामा मुंडे यांनी परिश्रम घेतले .