
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :-महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध दाखले परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा इ ग्राम सिटीझन कनेक्ट ॲप विकसित केले आहे यावरून ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणाऱ्या विविध सेवेसाठी अर्ज घरबसल्या करता येणार असून या योजनेतून कंधार तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत नागरिकांना सुविधा सहज व जलद गतीने पुरवण्यासाठी ए एस के ची स्थापना करण्यात आली या माध्यमातून ऑनलाईन डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्र वितरित करणारी कंधार तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत देवईचीवाडी ही ठरली असून या ग्रामपंचायतीची सरपंच ग्रामसेवक व संबंधित संगनक परिचालक यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे..
ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणारा जन्म दाखला विवाह नोंदणी दाखला मालमत्तेसंबंधी उतारे तसेच घरपट्टी पाणीपट्टी कर भरणा करायचा असल्यास ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज आता राहणार नाही यासाठी महाराष्ट्र सरकारने महाई ग्राम सिटीझन कनेक्ट ॲप सुरू केले आहे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये चकरा मारायला लागतात प्रत्येक वेळी आपल्याला दाखला वेळेवर मिळेलच याची शाश्वती नसते त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या अनेक सुविधा देण्यासाठी ही ॲप सुरू करण्यात आले होते कंधार तालुक्यातील देवईचीवाडी या ग्रामपंचायतीने या योजनेच्या माध्यमातून नमुना नंबर आठ डी एस सी सर्टिफिकेट काढून सुरुवात केली असून सदरची ही ग्रामपंचायत डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट वर सही करून नागरिकांना सुविधा सहज व जलद गतीने पुरवण्यासाठी पुढाकार घेऊन प्रथम कामगिरी केले आता या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन सर्व दाखले व प्रमाणपत्रे तातडीने व जलद गतीने दिलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने डिजिटल सहीने वितरित करण्यात आले आहे त्यामुळे अशा ऑनलाइन पद्धतीने व डिजिटल सहीचे पहिले प्रमाणपत्र वितरित करण्याचा मान कंधार तालुक्यातील देवईचीवाडी या ग्रामपंचायती मिळवला आहे यासाठी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी सरपंच ग्राम विकास अधिकारी निळकंठ मुगावे ग्रामपंचायत संगनक परिचालक व ग्रामपंचायतीच्या व नागरिकांच्या सहकार्याने याचे कौतुक होत आहे