
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव- संभाजी गोसावी.
उत्तर कोरेगांव तालुक्यांच्या उत्तर भागातील राजकीयदृष्ट्या समजल्या जाणाऱ्या (ता.कोरेगांव) करंजखोप येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ चवणेश्वर विकास आघाडीने सरपंच पदासह नऊ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच विरोधी चवणेश्वर ग्रामविकास पॅनलला केवळ एक जागा मिळाली. सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेले सरपंचपदी राधिका धुमाळ १२३३ मते मिळवत या सरपंच पदावर आता विराजमान झाल्या .तब्बल ३२४ मतांच्या फरकांने त्या विजयी झाल्या. श्रीनाथ चवणेश्वर विकास आघाडीचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे- सूरज शिंदे (५३१), अलका मनोहर नेवसे (५५०), शुभांगी वैराट (५६९), उदय धुमाळ (४१३), सिराज शेख (४१४), रुपाली धुमाळ (४१०), हणमंत धुमाळ (३१४), सारिका कर्णे (३१६). चवणेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रमिला भोसले २७८ मते मिळवत निवडून आल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऊपाध्यक्ष संदीप महाराज धुमाळ, सचिन धुमाळ, सतीश धुमाळ, राजुबुवा धुमाळ,अविनाश धुमाळ, गजानन आण्णा धुमाळ, विलास धुमाळ,बाळदादा धुमाळ, सुरेश शिंदे, संपत शिंदे, यशवंत आप्पा धुमाळ, राजेंद्र शिंदे, धनसिंग सोनवणे, विकास नेवसे, प्रमोद सोनवणे यांनी विजयी पॅनलचे नेतृत्व केले. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.