
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतचे निवडूनणूक लागली त्यामध्ये चार ग्रामपंचायत अविरोध झाल्यामुळे उरलेल्या 31ग्रामपंचायतचे मतदान 18डिसेंबर रोजी पार पडले. महिनाभर चालू असलेल्या निवडणूकीमुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले सर्व राजकीय पक्षाचे कारकर्ते प्राचारावर तुटून पडले होते थेट जनतेतून सरपंचांची निवड असल्यामुळे निवडणूकित चुरस पाहण्यास मिळाली त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल होते 20डिसेंबर रोजी निवडणूकिचे निकाल जाहीर झाले. त्यातमध्ये 35 ग्रामपंचायतमध्ये 20 ग्रामपंचायतचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात चहाच्या टपरीवर चहाचा घोट घेताना नागरिकात गावागावात चर्चा चालू असून तो चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येक पक्षाने विजयी झालेले उमेदवार आपल्याच पक्षाचे असल्याचे दावे अगदी दंड थोपटून केले आहेत. वास्तविक पाहता ग्रामीण भागातल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या राजकारणाला थारा नसतो; मात्र निवडून आल्यानंतर आमच्याच पक्षाच्या जागा जास्त निवडून आल्याचा दावा राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून हल्ली सर्रास होत असून राजकीय वातारण चांगलेच गरम झाल्याचे दिसून येत आहे.20तारखेला निकाल लागल्यावर निवडून आलेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध झाली प्रस्थापिताना डावलून विकास कामे करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आले. घराणे शाहिला शह देत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असं सामान्य नागरिक बोलत आहे
महिला सरपंच यादी
कर्णावळ – वर्षा कैलास चव्हाण,
जांभ्रूण -तुपा- मीरा विनोद जाधव,
बरबडा हजारे वैशाली रामेश्वर
एरंडेश्वर -कोकरशा -शेवंताबाई किसन राठोड,
पाकणी -आशा अंकुश चव्हाण ,
पोखरी केंधळे-अनिता मधुकर केंधळे,
देवठाणा -मंठा सौ निलावती गणेशराव मोरे,
उमरखेडा -उर्मिला आनंद जाधव,
नायगाव- -चंद्रकला महादेव सूर्यवंशी,
उस्वद -कमल उद्धव सरोदे ,
गेवराई -जयश्री सतीशराव खरात,
वाढेगाव -पांढुर्णा -छाया परमेश्वर शिंदे ,
रामतीर्थ -अर्चना सतीश झोल,
हेलसवाडी -शेख अमीनाबी बुढण ,
हेलस-गुंफाबाई विठ्ठलराव बनसोडे
काठला बु-.टकले राजुबाई बाबासाहेब,
लावणी -चव्हाण ज्योती दिपक,
अंभोरा शेळके -आघाव अरुणाबाई प्रसाद,
बिनविरोध महिला सरपंच यादी
आंधवाडी -कांबळे नागाबाई हरिभाऊ, कोकरंबा -इक्कर मंदोदरी विठोबा,
कार्यकर्त्यांचा, कावा सर्वांचा दावा!
हा घाटाटोप नेमका कशासाठी असा प्रश्न काही सरपंच करीत आहे.काही सरपंच म्हणत आहे की गावचा विकास महत्व पूर्ण असून गावचा विकास करायचा असेल तर आपले संबंध प्रत्येक पक्ष्याच्या नेत्याशी चांगले असणे गरजेचं आहे.त्यामुळे निवडून आल्यावर सगळ्याच नेत्याचा कार्यालयात जाऊन भेट घेऊन काही सरपंचांनी समाज माध्यमाशी बोलून सांगितलं.