
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
गंगाखेड विधानसभेतील
धारासुर गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १७ सप्टेंबर 2022रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणा नंतर औरंगाबाद येथे मा.ना.मुख्यमंत्र्यी श्री.एकनाथ शिंदे यांनी स्वत: २१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. तरीही तो निधी वित्तकडून सांस्कृतिक विभागास वर्ग झालेला नाही.
तसेच या पुर्वीही गुप्तेश्वर मंदिर जतन संवर्धन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाकडून ८ कोटी पुरातत्व विभागाचा मागणी केलेले असे एकूण २९ कोटी रुपये गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार.विकास करण्याठी त्वरीत वर्ग करावेत, यासाठी कर्तृत्वदक्ष कार्यसम्राट आ.डॉ.श्रु.रत्नाकरजी गुट्टे साहेब नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अधिनियम १०५ अन्वये लक्षवेधी प्रश्न मांडणार आहेत. गुप्तेश्वर मंदिर जीर्णोद्धार आवाज दुसर्यादां विधानसभेत घुमणार.आहे.