
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला दि. २२ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असुन जि. प. व पं. स.वर प्रशासकराज असल्यामुळे यात्रेचे नियोजन संपुर्णपणे ढेपाळले असुन यात्रेत यात्रेकरुला व व्यापाऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यात जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संदिप माळोदे ,व लोहा पं.स.चे प्रशासक तथा प्रभारी गटविकास अधिकारी शैलेश वावळे हे अपयशी ठरले असुन यामुळे यात्रेकरू व व्यापारी यांच्यासह जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असुन याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी तात्काळ लक्ष देऊन यात्रेत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने दोन वर्षांनंतर सर्व अटी व नियम शिथिल केल्यामुळे दोन वर्षांनंतर प्रथमच यंदा माळेगाव यात्रा भरली असून यात्रेच्या प्रारंभ दि. २२ रोजी देवस्वारीने झाला आहे.
भाविक भक्तांसह हवसे यात्रेकरू अनेक छोटे-मोठे व्यापारी , अनेक तमाशा मंडळे, अश्व व्यापारी, आदी मोठ्या संख्येने यात्रेत दाखल झाले आहेत.
पंरतु यंदा प्रथमच जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विभागांचे सभापती,पं.स. सभापती , सदस्य यांची गेल्या वर्षी मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून जि. प. च्या प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत व पंचायत समिती वर प्रशासक म्हणून प्रभारी गटविकास अधिकारी आहेत.
दरवर्षी माळेगांव यात्रेसाठी जवळपास ८० लक्ष रुपयांची निधीची तरतूद करण्यात येते पण यंदा प्रशासक काळात यात मोठी कपात करूत ५० ते ५१ लक्ष निधी असल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे यात्रेचा विकास व कार्यक्रमाला फटका बसला आहे.
यात्रेत वीज,पाणी, स्वच्छता , आदी सोयीचा अभाव जाणवत आहे असे अनेक जण सांगत आहेत.
जि.प. च्या शिक्षण, आरोग्य,समाज कल्याण, जिल्हा ग्रामीण विकास , महिला व बालकल्याण विभाग आदी स्टाॅलचे उद्घाटने हे दि. २२ रोजी सायंकाळी ५.३० ते ५.४५ वाजेपर्यंत झाले नव्हते त्यामुळे यात्रेकरुंना येथील माहिती यात्रेच्या पहिल्या दिवशी येणाऱ्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे प्रशासक राज विरोधात यात्रेमध्ये तीव्र नाराजी जनतेतून व्यक्त होत आहे.
तसेच पं.स. च्या वतीने माळेगांव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात प्रशासकीय सभा झाली याकडे अनेक ग्रामसेवकांनी, कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली . यासभेला काही प्रतिसाद मिळाला नाही . लोकप्रतिनिधी च्या काळात मोठा प्रतिसाद मिळत होता. सर्व पदाधिकारी , गावकरी , पत्रकार यांना सभेला निमंत्रण देत होते पण यंदा प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या काळात टीम वर्क चांगले नाही. कुणाला बोलविले नाही अनुभवी कर्मचाऱ्यांना बाजुला करण्यात आले. नवख्याचा हातात कारभार देण्यात आला त्यामुळे नियोजन ढेपाळले आहे.
एकंदरीत यंदा २०२२ च्या माळेगाव यात्रेत प्रशासकराजमुळे नियोजन ढेपाळले याकडे आता पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी लक्ष देऊन यात्रेचे सुत्रे हाती घेऊन यात्रा यशस्वी करावी कामचुकार अधिकारी- कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.