
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर येथील उपजिल्हा
रुग्णालयातील डॉ. प्रदीप ठक्करवाड यांनी केलेल्या महिलेच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याने आपल्या पत्नीस जीव गमवावा लागला, असा आरोप मयत महिलेच्या पतीने केला आहे. याप्रकरणी डॉ. ठक्करवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेच्या कुटुंबीयांसह शहरवासीयांनी केल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांनी डॉ. ठक्करवाड यांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे.
मयत महिलेचे नाव मनीषा शिंदे असे असून, ती २० डिसेंबर रोजी मयत झाली. याबाबत या महिलेचा पती प्रभाकर शिंदे यांनी देगलूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मनीषा शिंदे हिला कुटुंब नियोजन व प्रसूती रुग्णालय, देगलूर येथे १६ डिसेंबर रोजीदाखल करण्यात आले होते. रात्री नऊ वाजता
या महिलेवर
प्रसूतीची शस्त्रक्रिया चालू असताना डॉ. ठक्करवाड यांनी बाहेरून मेडिसिन आणण्यासाठी पाठवून दिल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी एक तास खोळंबा झाला. १०:५५ वाजता प्रसूतीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली व मुलगाजन्मास आला. त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही केली. यादरम्यान पोट फुगल्याचे कारण सांगून अधिक उपचारासाठी १९ रोजी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे या महिलेस यांनी तेथील डॉक्टरांशी चर्चा केली वबाहेर येऊन महिलेच्या पोटात रक्त व पाणी जमलेले आहे, त्यामुळे पुन्हा दिवसातच मुलाचे मातृछत्र हर एकदा शस्त्रक्रिया करावी लागेल, असे आहे. यास जबाबदार असलेले डॉ. नातेवाइकांना सांगितले. त्यामुळे १६ रोजी देगलूर येथे केलेली प्रसूती तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी देगलूर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांनी निवेदनामार्फत केलेली आहे