
दैनिक चालू वार्ता मुखेड तर ता. प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड तालुका रोटरी क्लबची नव्याने निवड करण्यात आली रोटरीच्या अध्यक्षपदी जगदीश बियाणी तर सचिव पदी प्रा.संजय पाटील यांची निवड करण्यात आली.
मुखेड शहरात रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले जाते. मात्र मागील कोरोना काळापासून रोटरी क्लबची चळवळ ठप्प झाली होती. आता पुन्हा नव्याने मुखेड शहरात रोटरी क्लबचे पूर्ण स्थापना केली जात असून सन २२-२३ च्या रोटरी क्लबचे पदग्रहण सोहळा आज संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रांतपाल डिस्ट्रिक सहप्रांतपाल रो.डॉ.शुभांगी पतंगे, रो.मुरलीघर भुतडा, रो.मितेश मालीवाल, रो. उमेश गरूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २२-२३ साठी रोटरी क्लब मुखेडच्या अध्यक्षपदी जगदीश बियाणी तर सचिवपदी प्रा.संजय पाटील यांची निवड करण्यात आली.