
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील दुधा आठवडी बाजारात पालेभाज्या व फळभाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. भाजीपाल्यासाठी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. सध्या रब्बी हंगामात अधिक भाजीपाला निघाल्याने बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले असून, सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जनावरांच्या चाऱ्यापेक्षा भाजीपाला स्वस्त
झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
बाजारात मध्यंतरी ते 40 रुपयांपर्यंत पोहोचलेली पालक भाजी आता तिचेही दर कमी झाले आहे. सध्या बाजारात पालक भाजी १० ते १५ रुपये किलो दराने मिळत आहे.हिरवी मिरची 60 रुपये किलो वरून आज 30रुपये आली मध्यंतरी मेथीची भाजी १५रुपये 1जुडीचे रुपयांपर्यंत पोहोचली होती. आता मेथीचे दर उतरले असून, बाजारात 10 रुपायात दोन तीन जुड्या येत आहेत. टमाटे, वांगे पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे कोणते पीक घ्यावे काय करावे याचे विचार मंथन शेतकरी करीत आहे.