
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथील नगरपालिकेचे लेखापाल व माजी नगरसेविका सौ. कांबळे यांचे चिरंजीव अमित व्यंकटराव कांबळे यांचा चार दिवसापूर्वी उदगीरला मोटरसायकलवर जात असताना रस्ता अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. काही दिवस नांदेड येथील यशोसाई हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर देगलूर कद्रेकर यांच्या खाजगी दवाखान्यात उपचारानंतर गुरुवारी २८ रोजीसकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजय, पुतणी असा मोठा परिवार आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले मनमिळाऊ व मित्तबाशी असलेल्या अमितचे असे अकाली जाणे सर्वांनाच चकवा देणारे ठरले. अंत्यसंस्कार प्रसंगी शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. येथील मुकुंदराज फुटवेअर व उदगीर येथील फुटवेअरचे ते संचालक होते.