
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
औरंगाबाद. घाई….परीक्षेची घाई… अभ्यासाचा ताण…… ट्रॅफिक जॅम… खड्डे रस्त्यांवरील वर्दळ…. होणारा उशीर….यात परीक्षार्थीचा गोंधळ उडतो… त्यातच रस्त्यावरील घाईमुळे एका मुलीचा अपघात होतो….. गाडी स्लीप होते.. पायाला मार लागतो. भळभळ रक्त वाहते. परीक्षेची वेळ, वेदना यांचा मेळ.. मनस्ताप तशाच अवस्थेत परीक्षा सेंटरवर जाते. सेंटरवर प्राचार्य परीक्षेचा स्टाफ जखमी मुलीला पाहून आस्थेने चौकशी करून काळजी घेत परीक्षा हॉल मध्ये बसवतात. धीर देतात. मुलगी माझा पेपर जातो वर्ष वाया जाते म्हणून रडत असते. लगोलग धावपळ करत स्वत: प्राचार्य फस्ट ॲड बॉक्स आणून पेपर चालू असतानांच मुलीची जखम रक्त पुसत मलमपट्टी करतात … आयोडीन लावून पट्टी बांधून, धीर देत मुलीला मानसिक आधार देत परीक्षेला, लिहायला तयार करतात….. मुलीच्या डोळ्यातील अश्रू आता वेदनेचे न राहता वेदनाशामक पालकांसाठीचे होतात. ती आता पेपर लिहिण्यात गर्क झाल्याचे पाहून प्राचार्य परत आपल्या केबीनमध्ये बसून कामात व्यस्त होतात.
ही घटना आहे 27 डिसेंबर 2022, मंगळवार दुपारी दोन वाजताची. खान सायमा खातून गफार खान ही ती मुलगी एम.ए. इंग्लिशची परीक्षा देणारी….. अन डॉक्टर होऊन उपचार करणारे प्राचार्य पालक आहेत डॉ. किशोर साळवे… आणि परीक्षा सेंटर होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद