
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील मरखेल- करडखेड रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, शिकवणी परिसरात शालेय विद्यार्थिनी / मुलींना त्रास देणान्या टवाळखोर लोकांचा कायमचा बंदोबस्त करून, पोलीस
मरखेल येथील करडखेड रस्त्यावर असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय, राजर्षी शाहू फार्मसी कॉलेज व गावालगत असलेल्या लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी कॉलेज, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज या परिसरात व करडखेड- मरखेल रस्ता, मयूर बार ते जुने कॉलेज रोडवर शाळा महाविद्यालयात शिकवणी साठी जाणाऱ्या व येणाऱ्या मुलींची छेड काढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
परिसरातील गावातून येणाऱ्या व गावातील मुलींना या टवाळखोर लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहनावर काही रिकामटेकड्या पोरांकडून कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवून दुचाकी जवळून नेऊन कट मारले जात आहे. यामुळे पालक व विद्यार्थी चिंतेत आहेत. पालकांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतावत आहे. याशिवाय शाळा- महाविद्यालय परिसरात काही उपटसुंभ्या लोकांकडून गरीब विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. तरी मे. साहेबांनी या शाळा व महाविद्यालय परिसरात व त्या रस्त्यावर मोकाट फिरून शालेय मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोर लोकांना कायद्याचा बडगा उगारून आवर घालावा. व शालेय परिसरात पोलिसांची नेहमी गस्त वाढवावी असे मरखेल करडखेल परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.