
दैनिक चालु वार्ता देगलूर ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांच्या विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला.
भारतातील पहिली स्त्री शिक्षिका भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ तसेच कवियत्री असलेल्या सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्रीवादाची ज्यांनी मानले जाते. पती ज्योतिराव फुले यांच्या समवेतत्यांनी भारतातील महिलांचे हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जाते . महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या चळवळीत त्यांना एक महत्त्वाचे स्थान आहे.
. सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांनी1884 पुण्यातील भिडे वाडा येथे. पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. महिलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडण्याचा अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेऊया, पुरुष स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने फक्त चूल आणि मूल यामध्ये स्त्रिया गुंतलेल्या होत्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना अगोदर शिक्षण देऊन स्वतः त्या इतर मुलींना शाळा शिकू लागल्या. त्या काळामध्ये स्त्रीने शिक्षण मिळवणे हा एक प्रकारचा पाप मानला जात असे. पण सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या दृष्टिकोन महाराष्ट्रातील बहुजन समाजातील व सर्व जाती धर्मातील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांनी मोठे कार्य केले. एकविसाव्या शतकामध्ये महिला व मुली आज मोठ्या प्रमाणात प्रगती करू लागले आहे. एकेकाळी शिक्षणाची संधी नव्हती,पण आज सावित्रीबाई फुले महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने महिलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळू लागले पण एकविसाव्या शतकामध्ये नोकरीच्या संधी कमी दिसू लागलेले आहेत आज प्रत्येक महिला घरातली शिकून सोडून मोठ मोठ्या पदावर आहे पण आज अनेक क्षेत्रातील महिलांना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत पण कुठेतरी आजही देखील महिलांनी स्वावलंबी राहणे काळाची गरज आहे. कारण स्वतःचा उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे आले पाहिजेत, इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये नोकरीच्या संधी फार कमी दिसू लागलेले आहेत खाजगी क्षेत्रात आज अनेक महिला स्वतः उद्योगी आणि स्वावलंबी राहून आपले कार्य पुढे नेले पाहिजेत, कारण सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक दृष्टिकोन विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक विचार आपल्या डोळ्यापुढे ठेवून व शैक्षणिक विचार अंगीकारून आपण सुशिक्षित उद्योजिका तर झालेच पाहिजे तर आपल्या समाजातील सर्व मुलींना त्यांना देखील हाताला त्यांच्या काम मिळविण्यासाठी तत्पर असल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे विचार महिलांनी सार्थक केल्यासारखे वाटेल सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
प्रा. भीमराव दिपके
सिंधू महाविद्यालय देगलूर