
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
मुदखेड : छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच..
मुदखेड भाजपा व भाजयुमोच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणारे अपमानजनक विधानाचा निषेध करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला.खा प्रतापराव चिखलीकर ,जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव गोजेगावकर व सर्व सन्माननीय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजषुमोचे जिल्हाध्यक्ष अँड.किशोरदेशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड छत्रपती शिवाजी महाराज चौक उमरी पॉईंट मुदखेड येथे निषेध करून पुतळा दहन करून आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी मंडळ अध्यक्ष श्री शंकर मुटकलवाड, भाजप अपंग विभागीय प्रमुख प्रविनजी गायकवाड, शहर अध्यक्ष मुन्ना चांडक, गोविंदजी गोपणपल्ले, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष देवा पाटील, शहर युवा अध्यक्ष गजानन कमळे , युवा जिल्हाचिटणीस विलास कल्याण, श्री दिलीपरावदेसाई, भगवानराव पुय्यड,श्री गणेशराव शिंदे, ,श्री आनंदराव शिंदे, श्री बुचडे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.