
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर;दिनांक 3.01.2023 रोजी 08.30 ते 09.30 वाजेच्या दरम्यान पोलीस ठाणे देगलूर रेझिंग डे निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर दौड मध्ये पोलीस ठाणे देगलूर येथील पोलीस अधिकारी, पोलीस आमलदार, हद्दीतील पत्रकार बांधव, शाळा / कॉलेज येथील विद्यार्थी, खेळाडु, प्रतिष्ठीत नागरीक अनेक संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपला उत्साह त्या ठिकाणी दाखवण्यात आले त्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला दुसरा तिसरा क्रमांक आलेल्या खेळाडूला पोलीस स्टेशन देगलूर चे पी आय सोहम माछरे यांनी त्या खेळाडूचा सत्कार केला रेझिंग डे निमित्य
पुढील आठ दिवसांमध्ये देगलूर शहरांमध्ये पोलीस स्टेशन तर्फे विविध कार्यक्रम
घेण्यात येणार आहे असे पी आय सोहम माछरे यांनी सांगितले.