
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- दर्यापूर तालुक्यातील श्री क्षेत्र अडुळा बाजार येथील विदेही संत लहानुजी महाराज यांच्यावर आज सकाळी अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हजारो भाविकांमध्ये शोककळा पसरली.त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अकोला व अडुळाच्या बाजारपेठेत भाविकांची गर्दी होत आहे.
श्री संत लहानुजी महाराज लहान मुलाच्या रूपात अडुळाच्या बाजारात प्रकटले.त्यांच्या चमत्कारांमुळे आणि आशीर्वादामुळे भक्तांची संख्या सतत वाढत गेली.त्यांच्या नावाने संस्था उभारल्यानंतर त्यांनी अध्यात्मिक आणि धार्मिक उत्सवांचे आयोजन करण्यास सुरुवात केली.अमरावती,अकोला जिल्ह्यातील भाविकांनी आर्थिक व्यवस्था करून भक्त निवास,प्रवेशद्वार,महाप्रसाद आदी वस्तू बांधल्या.त्यांचे पार्थिव दर्शन घेण्यासाठी भाविकांना अडुळाबाजार येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाविकांना देण्यात आली.अनंतात विलीन झालेल्या श्रीसंत लहानुजी महाराजांना भाविकांसह विविध संघटना आणि राजकारण्यांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे.