
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी .विष्णू मोहन पोले
आज मॉडेल इंग्लिश स्कूल अहमदपूर येथे शिक्षणाच्या महानायका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या जयंतीनिमित्त आज विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक विभागाचे मा.मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर सर .मा.विभागाचे मा.मुख्याध्यापक विवेक कुमठेकर सर शाळेच्या उप.मु.मा.सौ ठाकूर मॅडम आदरणीय, सौ ज्योती मॅडम या सर्वांनी दीपप्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन केले .यावेळेस संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होता . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चव्हाण मॅडम यांनी केले.अथर्व तीर्थकर व राजकन्या मूकनर या विद्यार्थ्यांनी “मी सावित्री बोलतीये “या एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले . बालिका दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाषणे दिली. आदरणीय जाधव मॅडम व ‘इंग्रजी विभागाचे प्रमुख आ.पिटाळे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून शैक्षणिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात स्त्रीचा सन्मान करावा हीच सावित्रीबाई फुले यांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेल असा विचार उप.मु. सो. ठाकूर मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. कोणत्याही क्षेत्रातील उणीव लक्षात घेऊन समाजासाठी स्वतःला समर्पित करता आले पाहिजे हा संदेश सावित्रीच्या यशोगाथेतून आपणास मिळतो. हा विचार विद्यार्थ्यांनी कायम स्मरणात ठेवावा असा संदेश माननीय मुख्याध्यापक कुमठेकर सर यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणचा समारोप करताना उस्फूर्तपणे स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन करून मा.मु. श्रीराम क्षीरसागर सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांचे शिक्षकांचे ,विद्यार्थ्यांचे ,हार्दिक आभार मानून सूत्रसंचालिका चव्हाण मॅडम यांनी कार्यक्रमास पूर्णविराम दिला.