
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
वझरगा :
-आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगा येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेषात येऊन जयंती साजरी केली. काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मत व्यक्त केले व गाणे गायले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बस्वराज पाटील वन्नाळीकर,सर्व शिक्षकवृंद, शा.पो.आ.कर्मचारी,सर्व अंगणवाडी कर्मचारी,गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.