
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व जि.प. खानापूर शाळेला 2028 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने गावातील तरुण मंडळींनी शाळेला अंधा राज्यात क्रमांक एकवर नेण्याचा व आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करण्याचा त्यासाठीभौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन व मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिकानि गुणवत्तेत शाळेला राज्यात क्रमांक एकवर नेण्याचे जो संकल्प केला आहे. त्या संकल्पनेची सुरुवात आज शाळेतील इयत्ता सहावीतील कन्या वर्षा सुंके या विद्यार्थिनीच्या हस्ते नारळ फोडून संकल्पनेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित मा. अनिल पाटील खानापूरकर, सरपंच प्रतिनिधी गौतम वाघमारे अशोकराव डुकरे सर शिवकुमार ताडकोले सर, अच्युत पाटील, जयदेव पाटील, शेषराव पाटील कदम पंडित गुरुजी, गौतम वाघमारे, शिवराज महाराज,भगवान पाटील अटकळे, विजय धनसूरे,निळकंठ पटणे, शिवराज खानापूरकर, व असंख्य युवक उपस्थित होते.