
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- शहरासह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये तसेच संघटनांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद कार्यालयात आज दिनांक ३ जानेवारी २०२३
मंगळवारी रोजी साजरी करण्यात आली तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष जोशी,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती प्रीती देशमुख,श्री.तुकाराम टेकाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य,श्री.चंद्रशेखर खंडारे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी,श्री.कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण,श्री.संजय देशमुख कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,श्री.गिरीश धायगुडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत,श्री.सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,श्री.दिनेश गायकवाड कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच कर्मचाऱ्यांमध्ये राजेश रोंघे,श्री.पंकज गुल्हाने,किशोर वानखडे,मंगेश मानकर,ओमेंद्र देशमुख,रजनी मस्के,सतीश पवार,समक्ष चांदृरे,राजू गाडे,जयप्रकाश लांजेवार,विजय शेलुकर,परमेश्वर राठोड,विजय उपरीकर,मंगेश मानकर,निलेश लेवटकर,गायत्री लाचूरे,श्रीमती पांडे,आदित्य तायडे,किशोर पन्नासे तसेच कार्यालयीन इतर पुरुष व महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.