
दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी -बालाजी देशमुख
श्रीराम माध्यमिक विद्यालय भारज & ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालय भारज शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार…..
आज शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ढाणे मॅडम तसेच प्रमुख अतिथी शाळे तील सहशिक्षिका देशमुख मॅडम व राजमाने मॅडम ज्ञानसागर निवासी विद्यालयाचे मुख्यध्यापक बालाजी देशमुख यांची उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर नाटक, एकांकिका तसेच सुंदर गाणी सादर केली. अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याला अनेक विद्यार्थ्यांनी भाषणातून उजाळा दिला. या कार्यक्रमावेळी बोलताना मुख्याध्यापिका मॅडम यांनी प्रत्येक मुलीने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती करावी व आई-वडिलांबरोबरच शाळेचे नावही प्रत्येक क्षेत्रात गाजवावे,अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिका नाटक व इतर कलागुणांचे कौतुकही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावी वर्गातील मुली निकिता शिंदे व गिरीजा कांबळे यांनी केले व आभार गायकवाड सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.