
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे- संभाजी गोसावी
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या सराईताला अटक केली भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकांने त्याच्याकडूंन सात दुचाकी आणि एक रिक्षा हस्तगत करण्यात आली. (राजेश प्रकाश परळकर वय३० सुखसागरनगर कात्रज ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दुचाकी आणि रिक्षा मौजमजेसाठी चोरल्यांचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस अंमलदार अभिजीत जाधव ,राहुल तांबे निलेश ढमढेरे हे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना राजेश परळकर यांना माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना याबाबत माहिती देवुन पथकांने कारवाई करत सातारा रोडवरील कदम प्लाझा समोरुन रिक्षासह आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत रिक्षा चोरीची असल्यांचे निष्पन्न झाले त्याने आणखीन सात दुचाकी चोरल्यांचे त्या तपासांत निष्पन्न झाली त्यानेही वाहने भारती विद्यापीठ सहकारनगर,हडपसर पोलीस ठाणे मार्केटयार्ड पोलीस ठाणे तसेच जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्यांचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिराट गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ उपनिरीक्षक धीरज गुप्ता हर्षल शिंदे सचिन गाडे विक्रम सावंत सचिन सरपाले मंगेश पवार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली. त्यांच्या या दमदार कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून कौतुक.