
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
खासदार सुनिल तटकरे हे महाराष्ट्र विधिमंडळात आमदार,मंत्री असताना त्यांनी केलेली काही भावस्पर्शी अभिनंदन व अभिवादनपर भाषणाचे केलेले संकलन पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहे.विधिमंडळातील त्यांच्या भाषणाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी देशाचे माजी गृहमंत्री,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.पुस्तक प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई (मंत्रालय जवळ )आयोजीत करण्यात आला आहे. आयोजीत कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,खासदार प्रफुल्ल पटेल,प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात,विधिमंडळ माजी अध्यक्ष नरहरी झिरवळ,सेना नेते भास्कर जाधव,माजी मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे जाहीर निमंत्रण आमदार धनंजय मुंडे,आमदार आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांनी दिले आहे.