दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
पन्हाळा येथील संजीवन ग्रुप आॅफ स्कूल च्या वतीने घेण्यात असलेल्या संजीवन गोल्ड कप फाईव्ह साईड वरिष्ठ हाॅकी स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने इस्लांमपूर च्या निशिकांत दादा स्पोर्टस् फौन्डेशन चा 4-2 गोलनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.दुसर्या उपांत्य सामन्यात देवगिरी फायटर्स वडगाव संघाने संजीवन स्पोर्टस् कल्ब पन्हाळा संघाचा 3-1 गोलनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिसर्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात संजीवन स्पोर्टस् कल्ब पन्हाळा संघाने निशिकांत दादा स्पोर्टस् फौन्डेशन इस्लांमपूर चा 4-2 गोलने पराभव करून तिसरा क्रमांक मिळवला.
चुरशिने झालेल्या अंतिम सामन्यात देवगिरी फायटर्स वडगाव संघाने कोल्हापूर पोलिस संघाचा 3-2 गोलने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.बक्षीस समारंभ संजीवन संस्थेचे सहसचिव एन.आर.भोसले,रणजीत इंगवले, सागर जाधव,सागर पाटील, संताजी भोसले, जयंत कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत झाले.स्पर्धेचे संयोजन सौरभ भोसले,गणेश पोवार,प्रमोद काळे व सचिन भोसले यांनी केले.स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश देशपांडे,संतोष चौगले,रामचंद्र पाटील व ओकार कावरे यांनी काम पाहीले.


