
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा ग्रामीण रुग्णालयाला शिवविच्छेदनासाठी अधिकृत कटर उपलब्ध नसल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जालना यांना निवेदनाद्वारे केली होती
जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की मंठा तालुक्यात 113 गाव जोडलेले ग्रामीण रुग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून मंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी अधिकृत कटर नव्हता, या निवेदनात पुढे असे म्हटले होते की मंठा शहरासह तालुक्यातील 113 गावासाठी एकच ग्रामीण रुग्णालय आहे चार प्राथमिक केंद्र असून तेथे अपुरा स्टाफ आहे मंठा शहर औरंगाबाद- नांदेड महामार्ग असून शेगाव -पंढरपूर दिंडी मार्ग एक किलोमीटर वर आहे त्यामुळे कोणताही अपघात झाला ,आत्महत्या झाली किंवा एखाद्याचा नैसर्गिक मृत्यू झाला व शिवविच्छेदन करायचे असल्यास अधिकृत कटर मिळत नव्हता त्यामुळे नातेवाईकाला खाजगी कटर शोधून तासंतास ताटकळत बसून आर्थिक भुर्दंड सोसावं लागत असेलयाची लेखी तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना यांना केली होती त्याची प्रतिलिपी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना सुद्धा दिली होती निवेदनाची प्रत मिळताच लोणीकरांनी जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांना भ्रमणध्वनी द्वारे सूचना केल्यामुळे मंठा ग्रामीण रुग्णालयाला तत्काळ अधिकृत कटर मिळाल्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.आर.गायके यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाच्या सूचनेवरून काढले त्यामुळे मंठा शहरासह ,113 गावाचा प्रश्न तत्काळ मार्गी लागला.