दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल मुलींचे मुखेड प्रशालेतील इयत्ता ०५ वी व ०८ व्या वर्गातील २२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत पात्र झाल्याबद्दल या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल, जनरल नाॅलेजची पुस्तिका व पुष्पहार देवुन दि.०७ जानेवारी रोजी यथोचित सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणुन सचिव तथा मुख्याध्यापक एम.आर.कांबळे, उपाध्यक्षा उर्मिला गिते, शिक्षक प्रतिनिधी आश्विनी कुलकर्णी, शा.व्य. समितीचे पदाधिकारी सुनिल तरगुडे, नंदकुमार काचावार, गौतम गवळे, अन्वर अत्तार, अनिल वाघमारे, भवानिसिंह चौव्हाण, सरदारबेगम पठाण, लक्ष्मिबाई यलमवाड, रूक्मिणबाई पंदीलवाड सह शालेय व्यवस्थापन समितीचे पधाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाप्रसंगी सहशिक्षक विश्वांभर जाधव, डाॅ.बरकत उल्ला, अंबादास देशमुख, नागनाथ स्वामी, कल्याण इंगळे, सुधीर शृंगारे, राहूल मेहरकर, पंढरी भालेराव, दिलीप देवकांबळे, बळीराम रूद्रावाड, हरिदास पवार, सचिनसिंह तेहरा, शामसुंदर दारकू, प्रकाश डोईजड, व्यंकटी केंद्रे, विरभद्र बेलुरे, फारूख शहाजोर, आर.पी.पटेल, दिलीप कांबळे, सहशिक्षिका मधुमती लोणीकर, प्रयाग बिचकुंदे, सुरेखा हराळे, श्रीमती आशालता स्वामी, सविता उमाटे, अनुपमा टाकळीकर, आर.पी.जाधव, शिवा मेहरकर, रत्नदीप सोनकांबळे, सेविका श्रीमती अंजना बोईनवाड, हरिबाई केळे व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


