दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
तालुक्यातील सर्वसामान्य तळागाळातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्था वैधानिक लेखापरीक्षण ‘अ’ वर्ग प्राप्त आसुन तालुक्यात ग्राहकांना छोटे मोठे व्यवसाय,शेती व गृह उद्योग करण्यास मदत करणारी सहकारी पतसंस्था म्हणुन म्हसळा तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून नावारूपास आली आहे.संस्था आर्थिक सहकार्या बरोबरच स्थानीक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे.आजच्या घडीला संस्थेच्या बँक व्यवसायात वृद्धी झाले असल्याने पतसंस्थेची आंबेत येथे शाखा आहे तर तालुक्यातील मेंदडी,पाभरे,खामगाव,खरसई,तुरुंबाडी येथे कलेक्शन केंद्र आहेत.शिवकृपा पत संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपल्याने सन २०२२/२३ ते २०२७/२८ पर्यंत संपन्न होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ६ जानेवारी २०२३ या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश शिंदे यांचे कडे अवघे ११ सदस्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याने पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.मतदान व निकालाची अंतिम तारीख दिनांक २९ जानेवारी पर्यंत असल्याने प्राप्त नामनिर्देशन पत्रानुसार नवीन संचालक मंडळ अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल.बिनविरोध संचालक मंडळामध्ये सर्वसाधरण जागेसाठी ६ सदस्य, महीला राखीव २ आणि इतर मागास प्रवर्ग,अनुसूचित जाती जमाती व भटकी विमुक्त जाती करिता प्रत्येकी एक असे एकुण ११ सदस्य पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले नुसार संचालक मंडळाचे नव्या कार्यकारणीमध्ये सदस्य मंडळाचे यादीत विद्यमान व्हॉईस चेअमन तथा माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,माजी चेअरमन शैलेश पटेल यांचा तर तुकाराम गीजे,महेंद्र पारेख,विश्वनाथ विचारे,सविता काणसे,ओंकार गिजे हे अनुभवी सदस्यांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.नव्याने माजी चेअरमन सुरेश कुडेकर यांनी संचालक मंडळात स्थान प्राप्त केले आहे तर महीला राखीव पदासाठी अनिता बारटक्के,अनंत येलवे आणि विलास खेडेकर यांचा समावेश आहे.चेअरमन पदासाठी माजी व्हॉईस चेअरमन दिलीप कांबळे आणि माजी चेअरमन शैलेश पटेल हे इच्छुक असल्याचे समजते.


