दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
शहरातील संतोषी माता रोडवर असलेल्या स्वामी विवेकानंद हाॅस्पीटल मध्ये कार्यरत महीला डाॅक्टर प्रियंका रमेश चांडक यांच्या मोबाईलवर सोमवारी दुपारी 12.58 वाजता 8902277450 या क्रमांवरुन डिअर युजर्स युवर एसबीआय नेट ए/सी बिल बि सस्पेन्डेड टुडे प्लीज अपडेत युवर पॅनकार्ड डिटेल्स क्लिक हियर http://uyth- dc26.web.app असा मॅसेज आला असल्याने डाॅ प्रियंका चांडक ने ते ओपन करुन त्यामध्ये विचारलेली माहीती भरल्याने फिर्यादीच्या खात्यामधुन 1,83,882/- रुपये अज्ञात भामट्याने परस्पर आॅनलाईन काढुन घेऊन फिर्यादीची फसवणुक केली.
दरम्यान या प्रकरणी डाॅ प्रियंका चांडक यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात भामट्या विरुध्द कलम 420 भादवी सह कलम 66 ड आ.टी. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला


