दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
बंदरकाठा माध्यमिक विद्यालय मजगावं ताम्हणे ता. तळा जिल्हा रायगड
भारती विद्यापीठाचे संस्थापक तथा माजी मंत्री डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंती निमित्त विदयालयात सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री विनयकुमार सोनावणे, युवा कार्यवाहक श्री रुपेश गमरे, महा. अनिस म्हसळा शाखा प्रधान श्री प्रमोद भांजी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांना समाजातील लोकांना कश्या प्रकार आपल्या जाळ्यात ओढतात ते आपल्या विविध प्रयोगाने , उपस्थितांनचे प्रबोधन, जगजागृती विषयी कार्यक्रम घेऊन समाजातील असलेल्या अंधश्रद्धे बद्दल माहिती व प्रयोग करून विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक हातचालाकी करून दाखविले
डॉ पतंगराव कदम साहेबाना शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले ते इतरांच्या वाट्याला येऊनेय हे हेरून त्यांनी भारतीविद्यापीठाची स्थापना करून त्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात सुरु करूनशिक्षणाची ज्ञान गंगा समाजातील तळागाळा पर्यंत पोहचवण्याचे काम साहेबानी केले असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक श्री बोबडे सर यांनी केले कार्यक्रमासाठी मुख्याद्यापक श्री गोटुकले, श्री वसावे, मेथा मॅडम, श्री लाहरे वाशीचे सरपंच श्री जगनाथ तांडेल,श्री संदीप गायकवाड साहेब ताम्हणे श्री. पाखड साहेब माजी सरपंच मजगावं ताम्हणे, श्री. पवार साहेब , श्री. दुरे साहेब तसेच वाशी हवेली प्राथमिक शाळेचे कुंभळे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी,सर्व शिक्षक शिक्षक्केत्तर कर्मचारी, विविध पदाधिकारी कार्यक्रमा साठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लाहरे सर यांनी केले तर आभार श्री बोबडे सर यांनी व्यक्त केले.


