दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
माळीवाडा. जि.अहमदनगर या .समाजसेविका,लेखिका, कथाकार, कवयित्री साहित्यिक , अँक्टिव्ह मराठी न्यूज नेटवर्क (संचालिका) अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा महीला काँग्रेसच्या सौ. ज्योतीताई उमेश साठे यांना” सावित्रीमायीची लेक ” या राष्ट्रीय पुरस्काराने डाॅ.भागवत कराड साहेब केंद्रीय राज्यमंत्री ,वित, भारत सरकार ,मा.कुलविंदर सिंग अध्यक्ष गुरूव्दारा रकाबगंजसाहेब यांच्या हस्ते देण्यात आला. नविदिल्ली,मा.विक्रमराव सोळसे जनकल्याण समितीचे नविदिल्ली , राजेंद्र साळवे , उमेश साठे, ना.म. साठे सर, तसेच अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत दि.३ जानेवारी २०२३ रोजी सावित्रीमाई यांच्या जयंतीनिमित्त नविन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान लोकशाहीर जन कल्यान सेवासमिती नवी दिल्ली यांच्या वतीने भव्य दिव्य असा महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला .सौ. ज्योती ताई साठे यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सौ. ज्योती ताई उमेश साठे यांना पुरस्कार मिळाल्याने महालक्ष्मी महीला बचत गट, पत्रकार मंडळी,सर्व मान्यवर, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.


