दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळका :- भारतीय जनता पार्टी बूथ संवाद दौरा व शक्ती केंद्रप्रमुख आणि गावकऱ्यांच्या भेटी-गाठीसाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात कळका ता.कंधार येथे भेटी-गाठी घेऊन संवाद साधण्यात आला.यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना खासदार साहेब म्हणाले की, जागतिक स्तरावरील प्रभावशाली नेतृत्व मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सर्व समावेशक विकास करत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातील हक्काचे युतीचे सरकार आले आहे. कळका व परिसरातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याचे मा.श्री.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी पा.चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सदैव तत्पर राहू असं गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी आश्वासित केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पा.चेअरमन,बाबुराव काका केंद्रे,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.चित्राताई गोरे,भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव राठोड,मधुकर डांगे,मधुकर पाये,गिरीधारी केंद्रे राजहंस शहापुरे,मा.उपसभापती पंजाबराव पा.वडजे, किशनराव डफडे सर, वरपडे सर,बोरीचे सरपंच बालाजी मामा झुंबाड दत्ता चंदनफुले, मुंडेवाडी चे सरपंच माऊली मुंडे,बालाजी वडजे,रजत शहापुरे,माजी सरपंच गोविंद भाई पा.गायकवाड,माजी सरपंच उत्तमराव पा.गायकवाड,शाऊजी पा.गायकवाड,अशोक पा. गायकवाड,सरपंच सुनंदाताई गाडेकर,उपसरपंच राजीव पा.गायकवाड,विजय साहेब गायकवाड,शक्ती केंद्रप्रमुख व्यंकटराव पा.गायकवाड,बुथ प्रमुख विठ्ठल पा.गायकवाड,रामचंद्र पा. गायकवाड,काशीराम पा. गायकवाड,भगवान पा. गायकवाड,गोपीनाथ पा.गायकवाड,शिवाजी पा.गायकवाड,केशव पा.गायकवाड,बळीराम गायकवाड,नवनाथ पुरी,लिंबाजी गायकवाड,विनायक गायकवाड, कैलास गायकवाड,सतीश गायकवाड,गणेश गायकवाड, त्रिंबक गायकवाड, शंकर गायकवाड,संतोष गायकवाड अजय गायकवाड,अनिल गायकवाड,दिलीप गायकवाड, सुनील गायकवाड,बालाजी गायकवाड, करुणाकर गायकवाड,अर्जुन जाधव यांच्यासह मोठया संख्येने गावकरी,पत्रकार बांधव, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले तर अविनाश कळकेकर,बालाजी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.


