दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी: राम चिंतलवाड
हिमायतनगर प्रतिनिधी:-शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील श्री ओमसाई मोटर्स व एम.एफ.होंडा रॉयल मोटर्स एजन्सींकडून संयुक्त विद्यमाने श्री परमेश्वर मंदिरासमोर दिनांक१०जानेवारी रोजी सकाळी रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅलीचेआयोजन करण्यातआले होते.उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना अविनाश राऊत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनीअसेआपल्या प्रस्तावनेत सांगितले की,तालुक्यासह शहरातील नागरिकांनी वाहन चालवत असताना वाहतूक नियमाचे कठोर पालन केले तर अपघातातुन कित्येकांचे जीव वाचतील,अपघातात कित्येक तरुणांचे जीव गेले आणि कायमचे अपंगत्वआलेआहे. त्या करिताआपणआपले वाहन सुव्यवस्थीत चालवावे.असे म्हणत नागरिकांना रस्ता सुरक्षेची शपथ देऊन आगामी काळात आम्ही राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक गावात जाऊन तेथील सरपंच,उपसरपंच यांना भेटून या शिबिराची माहिती देऊन,तेथील नागरिकांना वाहतूकीचे नियम सांगणार आहोत.ज्या गावात एक ही अपघात होणार नाहीत?त्या गावांना आम्ही महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन विभागाकडून पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित सन्मान करणार येईल.त्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करून अपघात मुक्त गाव करावे,असे त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना नम्र आवाहन केले.राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर होणाऱ्या अपघातात केवळ वाहन चालकानाचं दोष देवुन चालणार नाही,तर इतरअसंख्य घटक याआपघाताला कारणीभूतअसतात.त्यामुळे शहरातील नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी दिनांक१०जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहरात रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यातआले होते. रॅलीस शहरातील मा.श्री.के.आर खोंद्रे न्यायाधीश दिवानी कनिष्ठ व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी हिमायतनगर,अविनाश राऊत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी आज हिरवा झेंडा दाखवून ह्या रॅलीस सुरुवात केली आहे.सन्मानीय न्यायाधीश के.आर.खोंद्रे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना कायद्याचे व नियमाचे आपण कसे करावे,याविषयी मार्गदर्शन केलेआहे.पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी मनोगतातअसे म्हणाले की,आपण आपले वाहन चालवताना दारु पिवुन किंवाअति भरधाव वेगात वाहने चालू नये.आपले पाल्य जर ऑटो वाहनाने शहरातील शाळेत येतअसतील तर,त्या ऑटो चालकांकडे चालू विमा,गाडीचे कागदपत्रे व गाडीची मर्यादा किती आहे?हे तपासूनचं आपल्या मुलांमुलींस त्या वाहनाने शाळेत पाठवावे.अन्यथा मर्यादेपेक्षा जास्त मुले घेऊन येणाऱ्या गाडीचा दुदैवाने अपघात झालाअसेल.तर त्यांस कारणीभुतआपणचंअसू,असे उपस्थित पालकांना व नागरिकांना सांगितले.सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे,प्रादेशिक परिवहन मोटार वाहन निरीक्षक गणेश तपगीरे,अमोल सोमदे,धोंडीबा आवाड,माणिक कोरे शहरातील ओम साई मोटर्स एजन्सीचे दिलीप पाटील,एम.एफ.होंडा मोटर्स एजन्सीचे अब्दुल वाहेद सेट,तलाठी दत्तात्रय पुणेकर,चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बक्केवाड सह वकील,पत्रकार,पालक,विद्यार्थी,ड्रायव्हर व ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.


