
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
मौजे वझरगा येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद अभिवादन करताना.. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात अभ्यासपूर्ण भाषणे करून दोन्ही ऐतिहासिक प्रेरणादायी व्यक्तीमत्वांना अभिवादन करून प्रेरणा घेतली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बस्वराज पाटील वन्नाळीकर , शालेय समिती अध्यक्ष वसंत सूर्यवंशी, सौ कांबळे मॅडम, ज्ञानेश्वर कोकणे, पत्रकार माणिक सूर्यवंशी व तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.