
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
बिलोली: बिलोली तालुक्यातील सुरू असलेल्या आळंदी ते टाकळी (खु) डांबरीकरण जोड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आळंदी येथील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सह काही गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
बिलोली तालुक्यातील आळंदी ते टाकळी (खु) या २.५० किमी जोड रस्त्याचे नव्याने डांबरीकरण काम सुरू आहे. कामाच्या सुरुवातीस काम करणाऱ्या गुत्तेदाराकडून सदरील जोड रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे . परंतु आळंदी येथील महिला सरपंच अरुणा धर्मकरे, उपसरपंच आनंदा नायगावे सह काही गावकऱ्यांनी नवीन डांबरीकरण रस्ता करीत असताना गुत्तेदारांनी पूर्वीचा जुना रस्ता न उकरता त्या रस्त्यावर रस्त्यालगत असलेल्या शेताच्या कडेने नाला काढुन त्या नाल्यातील काळी माती रस्त्यावर टाकले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच सदरील रस्ता मजबूत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने संपूर्ण रस्ता उकरून रस्त्यातील खड्डे लेवल करून त्यावर मुरूम टाकणे अपेक्षित होते , परंतु तसे न करता अगोदर काळी माती व त्यावर मुरूम अंथरूण रस्ता निकुद्ध दर्जाचे करीत असल्याचे हे निवेदनात नमूद केले आहे. असे करीत असताना आम्ही गावकऱ्यांनी संबंधित रस्त्याचे काम पाहणारे सहाय्यक अभियंता अनिल जाधव व उपअभियंता चितळकर यांना भ्रमणध्वनी वरून वारंवार संपर्क साधून सदरील बाब लक्षात आणून दिले.तेंव्हा त्यांनी स्वतः येऊन चौकशी करून गुत्तेदारांना आमच्यासमोर रस्ता दर्जेदार करण्याची सूचना दिले होते.तरी पण संबंधित गुत्तेदाराने अधिकाऱ्याचे कांही न ऐकता काम निकुष्ट दर्जाचे करीत या कामात मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचे निवेदनात नमूद करीत जुना रस्ता पूर्ण9 उकरून त्यावर मुरूम टाकून व्यवस्थित दबाई करून डांबरीकरण होईपर्यंत सर्व काम दर्जेदार पद्धतीत करण्यात यावे. अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.असे नाही केल्यास संबंधित रस्त्याचे बिल अदा करू नये, जर केल्यास भविष्यात गावकऱ्यांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. असे ही निवेदनात नमूद करून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम देगलूर यांना ता.५ रोजी देण्यात आले आहे. या निवेदनावर महिला सरपंच अरुणा धर्मकरे व उपसरपंच आनंद नायगावेसह इतर १५ गावकऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत. यावर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर हे चौकशी करतील का? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.